ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर आपलं प्रशासन अतिरिक्त दहा टक्के कर लादेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या धोरणाला कोणतेही अपवाद असणार नाहीत, असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समूह असलेल्या ब्रिक्सनं अमेरिकेने केलेल्या कर वाढीचा निषेध केल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Site Admin | July 7, 2025 2:52 PM | Donald Trump | Tariff
ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर अमेरिकेचा १० % अतिरिक्त कर
