गाझामध्ये शांतता पुनर्स्थापित करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं मंजूर केला. १५ पैकी १३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं, तर रशिया आणि चीन या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. ट्रम्प यांच्या या प्रस्तावांतर्गत आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलाची नियुक्ती केली जाईल आणि शस्त्रसंधीच्या दिशेनं पुढची दिशा ठरवण्यात येईल. हमासनं शस्त्रं टाकणं आणि पॅलेस्टाईनच्या तंत्रज्ञांची संक्रमण समिती स्थापन करणं यांचाही या प्रस्तावात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय शांतता मंडळाच्या अंतर्गत ही समिती काम करेल. इस्रायलनं सुरक्षा परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा प्रस्ताव पॅलेस्टाइनच्या हिताचं रक्षण करणारा आणि द्विराष्ट्र सिद्धांताला दुजोरा देणारा असल्याचं सांगून पॅलेस्टाईननंही याला पाठिंबा दिला आहे. मात्र, हमासनं हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
Site Admin | November 18, 2025 7:16 PM | Donald Trump | Gaza Ceasefire Deal
ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला UNSC ची मंजुरी