डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 22, 2025 1:34 PM | Donald Trump

printer

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिन्ही सेनादलांच्या संयुक्त प्रमुखांची हकालपट्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही सेनादलांचे संयुक्त प्रमुख हवाई दलाचे जनरल  C Q ब्राऊन ज्युनियर यांना अचानक पदावरुन दूर केलं.  गेले १६ महिने ते या पदावर कार्यरत होते आणि गेल्या ४० वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत होते. ते कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे समर्थक होते. 

 

त्यांच्या जागी ट्रम्प यांनी हवाई दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डान रेझिन केन यांची नियुक्ती केली आहे. काही काळापूर्वी ते CIA मध्ये लष्करी व्यवहारविषयक सह संचालक म्हणून कार्यरत होते. 

 

याशिवाय नौदलाच्या कारवाई विभागाचे प्रमुख ॲडमिरल लिसा फ्रानचेट्टी आणि हवाई दलाचे उप प्रमुख जनरल जिम स्लाइफ यांनाही ट्रम्प यांनी काढून टाकलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.