रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार असून युरोपीय देशांचे नेतेही यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अमेरिकेला येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.
दुसरीकडे अमेरिका रशियावर दुसऱ्या टप्प्यातले निर्बंध लादण्याची तयारी करत असल्याचंही ट्रम्प यांनी आज जाहीर केलं. ते व्हाईट हाऊस परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अमेरिका आणि युरोपीय संघानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांवर निर्बंध लादले तर रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, असं नुकतंच अमरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेट यांनी म्हटलं होतं.