May 3, 2025 7:40 PM | Dnyaneshwari

printer

राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप करण्यात येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली.

 

संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र आळंदी इथं सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या पारायण सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे.