बीडच्या शेतकऱ्यांचा पीक विमा ३१ ऑगस्टपूर्वी वितरीत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.