March 4, 2025 7:27 PM

views 293

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारला

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे असं फडनवीस यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्र...

February 18, 2025 3:21 PM

views 48

धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाला ६९ दिवस पूर्ण झाले तरी अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. आपण येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असंही सुळे यावेळी म्हणाल्या. 

October 1, 2024 7:01 PM

views 25

२०२३च्या खरीप हंगामातील उर्वरीत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

राज्यात सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना १ हजार ९२७ कोटी रुपये लवकरच वितरीत होतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.      

September 19, 2024 7:38 PM

views 26

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.यासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा आणि नियोजन बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला केंद्र शासन...

September 5, 2024 9:37 AM

views 28

अतिवृष्टीग्रस्त भागात पंचमाने न करता नियमानुसार आर्थिक मदतीची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतीपिकाच्या नुकसानाचे पंचमाने न करता, अतिवृष्टीच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही घोषना केल्याचं आमचे वार्ताहरने कळवलं आहे. दरम्यान, परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बैठक घेत, नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. परभणी जिल्ह्यातही पिकांच्या नुकसानाची मुंडे यांनी काल पाहणी केली.

September 2, 2024 8:58 PM

views 29

कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ४,१९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर

२०२३ मधल्या खरीप हंगामादरम्यान कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकरता  राज्य शासनानं सुमारे ४ हजार १९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केलं आहे. हे अर्थसाह्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असून या वर्गवारीची सुरुवात १० सप्टेंबरपासून केली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

August 14, 2024 9:03 AM

views 30

बीडच्या शेतकऱ्यांचा पीक विमा ३१ ऑगस्टपूर्वी वितरीत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.

August 11, 2024 2:30 PM

views 26

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य – कृषीमंत्री धनंजय मुंडे

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ सालाकरता प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यायची शासनाची योजना आहे. त्याकरता पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार आणि बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करू देण्यासंदर्भातलं त्यांचं वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणं आवश्यक आहे, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.   २०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनचे कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य...

July 16, 2024 3:07 PM

views 49

शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत होती.   मात्र,राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही; त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.    

June 15, 2024 9:13 AM

views 36

कृषी निविष्ठांच्या कृत्रिम टंचाई प्रकरणी धडक कारवाई

राज्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई भासवली जात असून, या प्रकरणी धडक कारवाई केली जात असल्याचं, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर कृती दल नेमून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. दरम्यान, बीड जिल्ह्यात महावितरण कडील प्रलंबित कामं, पावसाळ्याचं नियोजन, विविध योजना आदींच्या संदर्भात काल मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.