महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मदत निधी वाढवून देण्याबाबत सूचनांचा विचार करून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन महाजन यांनी दिलं. राज्यातल्या विविध विकास कामांमधे मेघा इंजिनियरिंग या कंपनीनं ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.