धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, आणि सन्मान जनक जागा भाजपानं दिल्या तरच युती करुन निवडणुका लढवायला पक्ष अनुकूल आहे. मात्र प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या इतकी मोठी असल्यानं पुरेशा जागा देणं अवघड होतं, असं ते म्हणाले. धुळे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे  २८० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले असून आज अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.