राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.
धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं काल रात्री एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररीत्या जखमी झाले. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे यांच्या प्रचारासाठी फिरणारी ही कार चालकाचा पाय ॲक्सिलरेटरमधे अडकल्यानं काही दुचाकी वाहनांवर आदळून उलटली. मृतांमधे चालकांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.