राज्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने धाराशिव तालुक्यात उपळा इथे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत १० शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर १० शेतकऱ्यांच्या शेतात एआय सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या हवामान केंद्रांच्या २० किलोमीटर परिघातल्या शेतकऱ्यांना पाऊस, वातावरणातली आर्द्रता, उष्णता यांची निरीक्षणं एआयच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हवामान आणि जमिनीची स्थिती याचा अभ्यास करून सोयाबीन पिकावर पडणाऱ्या कीड रोगांचे व्यवस्थापन तसंच पाणी व्यवस्थापन याला मदत होणार आहे.
Site Admin | August 7, 2025 3:36 PM | AI | Dharashiv
धाराशिवमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी AI चा वापर
