उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातलं सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जियो वल्ड ट्रेड सेंटर इथं इंडिया-ऑस्ट्रेलिया मंचाच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.
गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असून, विविध क्षेत्रांविषयी नवीन आणि परिपूर्ण धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणं जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राची समावेश आहे. व्यापार सुलभतेत नव्यानं सुधारणा केल्या जात आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितल.