डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकऱ्यांसाठी २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषीसंकल्प अभियान सुरु होणार

शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान  यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

देशातल्या  ७२३ जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे ६५ हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल. जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील असं त्यांनी सांगितलं.

 

शेती क्षेत्रामुळे सुमारे निम्म्या लोकसंख्येला रोजगार मिळतो, आणि अन्नसुरक्षेचा पाया घातला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  विकसित भारताच्या संकल्पनेत, ‘विकसित कृषी- समृद्ध किसान’ असं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. २०२३-२०२४ या वर्षात  एकूण अन्नधान्य उत्पादन ५५७ लाख टन झालं ते २०२४ -२५ या वर्षात एक हजार ६६४ लाख टनांपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा