डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 24, 2025 1:42 PM | Conference | Delhi

printer

महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

‘शांतीरक्षक महिलाः विकसनशील राष्ट्रांचा दृष्टीकोन’ या विषयावरील महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या ३५ शांतीसेनेच्या तुकड्यांचा सहभाग असेल. परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचं बीजभाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्यविभागाचे महासचिव जीन पियरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक ख्रिश्चन सॉन्डर्स संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. परिषदेतल्या सहभागी महिला शांती सैनिक राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.