January 20, 2025 1:38 PM | Delhi | Trains Delay

printer

दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

दाट धुक्यामुळे दिल्ली एनसीआर परिसरात दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या १९ गाड्या काही तास उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. यात नौचंदी एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, गरीब रथ, गोवा एक्स्प्रेस, पद्मावत एक्स्प्रेस आणि गोंडवाना एक्स्प्रेसचा समावेश आहे.