दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून त्याच्या दुकानाच्या फ्रीहोल्ड प्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावरून सापळा लावत सीबीआयने या अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं.