April 1, 2025 8:02 PM | Defence Exports

printer

संरक्षण क्षेत्रातल्या निर्यातीत १२ टक्क्यांनी वाढ

गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातली निर्यात १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी २३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पलीकडे केली. त्यात संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे ४३ टक्के म्हणजेच ८ हजार ३८९ कोटी रुपये होता. २०२९ पर्यंत देशातून होणारी संरक्षण क्षेत्रातली निर्यात ५० हजार कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज व्यक्त केला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.