January 22, 2026 3:40 PM | Davos | pen | Raigad

printer

तिसरी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसरातल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. रायगड जिल्हा हा भारताचा पहिला समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. जागतिक कंपन्यांनी या विकास केंद्राला गुंतवणूक आणि प्रमुख व्यवसाय म्हणून विचारात घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुंबई विमानतळाजवळ अत्याधुनिक नवोन्मेष शहर म्हणजेच इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची घोषणाही यावेळी फडणवीस यांनी केली. या प्रकल्पासाठी टाटा समूह 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. स्टार्टअप समुदायाला पाठिंबा देण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेली प्लग अँड प्ले ही परिसंस्था उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं.