January 22, 2026 3:40 PM

views 56

तिसरी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसरातल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. रायगड जिल्हा हा भारताचा पहिला समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. जागतिक कंपन्यांनी या विकास केंद्राला गुंतवणूक आणि प्रमुख व्यवसाय म्हणून विचारात घेण्याचं आवाहन मुख्य...

January 18, 2026 2:47 PM

views 26

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होणार

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होत असून, त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ३ हजारापेक्षा जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. त्यासाठी ५ हजारापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक, स्नायपर्स, एआय-चालित ड्रोन, हवाई क्षेत्रावर निर्बंध आणि हेरगिरीविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ‘अ स्पिरिट ऑफ डायलॉग’ ही यंदाच्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेची संकल्पना आहे. 

January 23, 2025 1:30 PM

views 32

दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

  स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा करार एमएसएन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून, त्यात राज्याच्या 'अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट' उपक्रमांतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प...

January 21, 2025 12:51 PM

views 23

जागतिक आर्थिक मंच : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध राज्यांचे आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आज विविध कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तसंच अनेक सामंजस्य करार करणार आहेत. जागतिक आर्थिक मंचाच्या स्वागत समारंभाला ते आज उपस्थित राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक क्लॉस श्वाब आणि होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांची भेट घ...