डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं  ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

 

ओदिशा किनारपट्टीवरच्या भितरकणिका आणि धामरा दरम्यान हे वादळ धडक देईल, असा अंदाज हवामानाच्या अनेक मॉडेल्सनं वर्तवला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

 

वादळाच्या प्रभावामुळे उद्यापासून या भागात पाऊस जोर पकडणार असून, हवामान विभागानं मयूरभंज, कटक, जाजपूर, बालासोर, भद्रक, केंद्रपारा, खोरधा, केओंझार, पुरी आणि जगतसिंगपूर या भागाला  येत्या गुरुवारी पावसाचा आणि पुराचा रेड अलर्ट जारी केला आहे. ओदिशाच्या किनारपट्टी भागात एनडीआरएफ नं आपत्कालीन प्रतिसादासाठी आपल्या ११ तुकड्या तैनात केल्या असून, भारतीय लष्कर, नौदल आणि तटरक्षक दल देखील बचाव कार्यासाठी सज्ज आहे.  

 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकारनं किनारपट्टी भागातल्या आणि लगतच्या १४जिल्ह्यांमधल्या सर्व शाळा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ओदिशा राज्याचा तीन दिवसांचा पूर्वनियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.