मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. थायलंडमधून तस्करी करून आणलेल्या या गांजाची बेकायदेशीर बाजारपेठेत अंदाजे २४ कोटी ६६ लाख रुपये किंमत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे.
Site Admin | June 22, 2025 7:55 PM | CSMI Airport | drug
CSMI विमानतळावर २४ किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा
