मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने या आठवड्यात १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ आणि आणि इतर वस्तू जप्त केल्या. वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकॉक हून आलेल्या प्रवाशांकडून १२ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. त्याचं मूल्य १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सहा प्रवाशांना एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात, अधिकाऱ्यांनी शारजाहून आलेल्या तीन प्रवाशांकडून ४० आयफोन १७ प्रो मॅक्स युनिट्स, ३० लॅपटॉप, १२ दारूच्या बाटल्या आणि सिगारेट जप्त केल्या. त्याची किंमत ५६ लाखापेक्षा जास्त आहे. या प्रवाशांना सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली.
Site Admin | October 30, 2025 3:52 PM | CSMI Airport
CSMI विमानतळावर १३ कोटींहून जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त