मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विविध वन्यप्राणी जप्त केले आणि दोघांना अटक केली. पहिल्या प्रकरणात गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉक इथून मुंबईला उतरलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत आणि एक मृत मिरकॅट, आणि एक ग्रेट बिल्ड पोपट आढळून आले. तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉक इथून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दोन सुमात्रन पट्टेरी ससे, एक मृत ग्रेट बिल्ड पोपट आणि एक इंडोचायनीज बॉक्स कासव असे प्राणी आढळून आले. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
Site Admin | July 12, 2025 1:30 PM | CSMI Airport | Mumbai Customs-III
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध वन्यप्राणी जप्त
