भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३०० धावा केल्या.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३४ षटकात २ बाद — धावा झाल्या होत्या. शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी केली.