कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या काळात, वरकरणी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्युंबाबत केलेल्या संशोधनातून, अशा मृत्यूंमागे अनुवांशिकता, जीवनशैली आणि आधीच असलेले आजार, अशी कारणं असल्याचं या संस्थांच्या निष्कर्षात म्हटलं आहे.
Site Admin | July 2, 2025 8:34 PM | COVID-19
कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्परसंबंध नसल्याचा ICMR चा निष्कर्ष
