डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 30, 2024 12:59 PM | Home Minister Amit Shah

printer

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचं प्रधानमंत्र्यांबद्दलचं वक्तव्य अशोभनीय – मंत्री अमित शाह

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जम्मू काश्मीरमध्ये प्रचारसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अशोभनीय असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. यातून काँग्रेस नेत्यांचा मोदींविषयीचा तिरस्कार आणि भिती दिसते असं शाह म्हणाले. मल्लिकार्जुन खरगे काल जम्मू काश्मीरमधल्या जसरोटा इथल्या प्रचारसभेला संबोधित करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, काही वेळ विश्राम केल्यानंतर खरगे यांनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं आणि प्रधानमंत्री मोदी यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आपण मरणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यावरून शाह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.