November 8, 2024 1:34 PM | Chathpuja2024

printer

छठ महापर्वाचा समारोप

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्य नारायणाच्या छट पूजेच्या महापर्वाची सांगता आज होत आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या या उत्सवात नहाय खाय, खरना, सूर्यास्त पूजा आणि अर्घ्य अर्पण या विधींचा समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने छट पूजा साजरी केली जाते. आज या पूजेच्या चौथ्या दिवशी भविकांनी नदी, तलाव आणि जलाशयांवर गर्दी केली होती.

 

सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्यदान करण्यात आलं, मैथिली भाषेतल्या छटपूजेची गाणीही लावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी फटाके फोडून हा उत्सव साजरा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील लखनौ इथल्या छटपूजेत सहभागी झाले होते.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना छटपूजेच्या सांगता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छट महापर्वाच्या या उत्सवामुळे सर्वांच्या आयुष्यात नवीन उर्जा आणि चैतन्य निर्माण होवो, असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.