November 8, 2024 1:34 PM

views 17

छठ महापर्वाचा समारोप

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्य नारायणाच्या छट पूजेच्या महापर्वाची सांगता आज होत आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या या उत्सवात नहाय खाय, खरना, सूर्यास्त पूजा आणि अर्घ्य अर्पण या विधींचा समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने छट पूजा साजरी केली जाते. आज या पूजेच्या चौथ्या दिवशी भविकांनी नदी, तलाव आणि जलाशयांवर गर्दी केली होती.   सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्यदान करण्यात आलं, मैथिली भाषेतल्या छटपूजेची गाणीही लावण्यात आली होती. त्यानंतर सर्व...

November 7, 2024 10:34 AM

views 26

छटपूजेनिमित्त द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छटपूजेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. छटपूजा हा देशातल्या सर्वांत प्राचीन सणांपैकी एक असून, सूर्याचं पूजन करण्याची ती संधी आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.   हा सण नद्या आणि तलावांबाबत कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपवासाच्या माध्यमातून मन आणि आत्मा शुद्ध करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. हा सण पर्यावरणाचं रक्षण करण्याचीही प्रेरणा देतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.