APM अर्थात जुन्या खाणीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत उद्यापासून ४ टक्क्यांनी वाढवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यामुळं सीएनजी, पीएनजी महागण्याची शक्यता आहे.
साडे ६ डॉलर MMBtu वरुन हा दर पावणे ७ डॉलर MMBtu झाला आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच ही दरवाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री मंडळानं एप्रिल २०२३ मध्येच याला मंजुरी दिली होती.