रे रोड केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज आणि टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

संपूर्ण राज्य रेल्वेफाटकमुक्त करायच्या उद्देशानं महारेलनं राज्यभरात मोठ्या प्रमाणात रेल्वे पूल बांधण्याचं काम हाती घेतलं असून यापैकी ३२ पूल पूर्ण झाले आहेत, तर या वर्षी २५ पूल पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. रे रोड केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज आणि टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. रे रोड केबल स्टेड ब्रिज हा महारेलनं बांधलेला मुंबईतला पहिला केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज असून त्याचं काम अतिशय अडचणीच्या परिस्थितीत, वाहतुकीला कमीत कमी अडथळा आणून, उत्तम तंत्रज्ञान वापरून वेगाने महारेलनं पूर्ण केलं आहे, असं कौतुक फडणवीस यांनी केलं. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मनीषा कायंदे, मनोज जामसुतकर, प्रवीण दरेकर, महारेलचे पदाधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.