पुण्यात निळ्या पूररेषेतील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वारंवार उद्भवू नये म्हणून, निळ्या पूररेषेतील नागरिकांचं,कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वयानं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड रास्ता इथं पूर संरक्षक मजबूत भिंत बांधण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून, याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचं काम करावं, असं सांगितलं आहे. पुरात वाहनांचं नुकसान झाल्यानं विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून तातडीनं वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं, काल वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.