डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वंदे भारतमुळे वेळेची बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल – मुख्यमंत्री

देशात नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरु झाली असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या प्रवासाला आधी १६ ते १७ तास लागत होते ते अंतर आता  केवळ बारा तासात कापणं शक्य होणार असून त्यासाठी त्यांनी  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

 

सध्या अहिल्यानगर वरुन रेल्वेगाडी दौन्डला जाऊन नंतर पुण्याला जाते, यामुळे नगर ते पुणे असा रेल्वेमार्ग तयार झाल्यास वेळेची बचत होईल तसंच अंतर देखील कमी होईल, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे हा औद्योगिक पट्टा असून इथला विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणं  गरजेचं आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवीन एक्सप्रेस वे निर्माण करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.