डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाचं काम सुरू आहे, असं फडनवीस यांनी सांगितलं. यावेळी माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती उपस्थित होते.