डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे शेकडो कोटी रुपयांची बचत – मुख्यमंत्री

राज्यानं तयार केलेल्या डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे अल्पावधीतच शेकडो कोटी रुपयांची बचत झाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूर इथं सायबर हॅक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या समर्पित व्यासपीठानं सायबर धोक्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली असून इतर राज्य या प्रणालीचं अनुकरण करायला उत्सुक असल्याचं ते म्हणाले.