मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मोक्का लावण्याकरिता नियम पहावे लागतील, मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ७०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं.