बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या  तृणधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा,  यासाठी कृषी  उत्पादनांचे  प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही चौहान यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.