डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवरच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

 

स्वच्छता उपक्रमानंतर एक पेड माँ के नाम या अंतर्गंत एक झाड वायकरांच्या हस्ते लावण्यात आले. मुंबई महापालिकेने घेतलेल्या चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्यांचा वायकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.