स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यामधे गावांमधल्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, घनककचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन आणि त्याच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे.
Site Admin | June 24, 2025 3:22 PM | Cleanliness Survey | Dharashiv
धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार