पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी आज मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखेरीज ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी आवश्यक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉक ड्रिल घेण्यात आलं.
हल्ला झाला तर सुरक्षेच्या दृष्टीनं करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष, इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे.