डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 8, 2025 2:56 PM | Donald Trump

printer

US: जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

अमेरिकेत व्हिसा वर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिऍटल इथल्या फेडरल न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयानं अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. ट्रम्प हे संविधानाचा दुरुपयोग करून धोरणात्मक डावपेच खेळत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. याआधी मेरीलँड इथल्या न्यायालयानंही अशाच प्रकारचा निर्णय दिला होता. एखादं सरकार धोरणात्मक डावपेच करून संविधानाशी छेडछाड करु शकत नाही, सरकारला जन्मसिद्ध नागरिकत्वासंदर्भात नियमांत बदल करायचा  असेल तर त्यासाठी सर्वप्रथम संविधानात सुधारणा करण्याच्या मार्गानेच जावं लागेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.