October 19, 2025 10:42 AM | Donald Trump | Protest

printer

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारभार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी देशाच्या विविध भागातले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अटलांटा, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. ट्रंप यांच्या हुकुमशाही कारभारामुळे अमेरिकी लोकशाही धोक्यात आली असल्याचं निदर्शकांचं म्हणणं आहे. स्थलांतरीतांविरुद्ध उगारलेला बडगा, आरोग्यसेवेच्या तरतुदीत कपात आणि रस्त्यांवर सुरक्षा दलांची नेमणूक ह्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ट्रंप विरोधी नेत्यांनी मात्र नागरिकांना शांततापूर्ण निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.