डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली आहे. राईट हे लिबर्टी एनर्जी या जीवाश्म इंधनाच्या पुरस्कर्त्या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ट्रम्प यांच्या तेल आणि वायूचं उत्पादन वाढवण्याच्या उद्दिष्टांशी त्यांची मतं जुळतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय हवामान बदलासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल ट्रम्प यांच्या धोरणाचं ते समर्थन करतील अशी शक्यता आहे. हवामान बदलाच्या चिंतेला अतिशयोक्तीपूर्ण म्हणून नाकारण्यासाठी राईट ओळखले जातात आणि सध्या कोणतेही ऊर्जा संक्रमण होत नसल्याचं त्यांचं मत आहे.