स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक

एसटी महामंडळाने घेतलेल्या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात ‘अ’ वर्गामध्ये जळगावं जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला असून बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.  ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला पहिला क्रमांक आला असून बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मिळाले आहे. तर ‘क’ वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ही स्पर्धा राज्यभरातल्या ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.