October 15, 2024 8:33 AM

views 22

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं काल जाहीर केलं.

June 26, 2024 7:30 PM

views 24

स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक

एसटी महामंडळाने घेतलेल्या स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात 'अ' वर्गामध्ये जळगावं जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला असून बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.  'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या साकोली बसस्थानकाला पहिला क्रमांक आला असून बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मिळाले आहे. तर 'क' वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातल्या मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात य...