बंगळुरू चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागितला सद्यस्थिती अहवाल

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरी बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सद्यस्थिती अहवाल मागितला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात हजारो क्रिकेटप्रेमींनी विविध प्रवेशद्वारांमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. या संदर्भात दाखल झालेल्या स्युओमोटो जनहित याचिकेवर आज न्यायालयाने हे निर्देश दिले. पुढची सुनावणी येत्या मंगळवारी १० जून रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.