पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.