भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या विचारातून हे शक्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कच्चा माल तिथं उपलब्ध आहे. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचं नेतृत्व भारत करेल. त्यासाठी उद्योजकांनी आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असंही फडनवीस म्हणाले. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांसाठी एक भव्य इमारत उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पापुआ न्यू गिनीच्या शिष्टमंडळाने गॅस उत्खननासाठी भारताला निमंत्रण दिल्याचं ते म्हणाले.
चंद्रपूरमध्ये २ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठीचं इरादापत्र श्री सिमेंटच्या बांगर समूहानं यावेळी मुख्यमंत्र्यांना सादर केलं.