पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट

पुढच्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट असून, या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये विधान भवनात झालेल्या बैठकीत बोलत होते.

 

नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी राज्यातल्या अती दुर्गम भागात पोलीस चौक्या स्थापन करून या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसंच नक्षलवाद मुक्त भागातल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला राज्यशासनाचे आणि पोलीस दलातले अधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.