अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील २८९ कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते, यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री संजय राठोड उपस्थित होते.
अनुकंपा तत्वावरील एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबर २०२६ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करु असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.