अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली.
अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर होणारे संभाव्य परिणाम, तसंच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील उद्योगांचं हित आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.